पुणे- मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात काही गँगस्टरने डोके वर काढण्यास सुरुवात केली होती. नुकतीच कारागृहातून बाहेर येताच मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गज्या मारणे याने रॅली काढून दहशत माजवली होती.पुणे पोलिसांवर यानंतर चौफेर टीका झाली होती. आता पोलिसानी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
गजा मारणे यानेमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून ही शेकडो चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक काढण्यात आली होती.या घटनेचे व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांसह पुणे पोलिसांनी देखील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गजा मारणेवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. अटकेच्या भीतीने गजा मारणे पुणे पोलिसांच्या फरार झाला होता.
दरम्यान,यानंतर काल सातारा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला जेरबंद केलं. जावळी-महाबळेश्वर भागात गजा मारणे असल्याचा सुगावा लागताच मेढा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे.
तळोजातून सुटलेल्या गजा मारणेची आता येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला कुख्यात गुंड गजा मारणे पाठोपाठ गुंड शरद मोहोळच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. 26 जानेवारीला शरद मोहोळने हजेरी लावलेल्या कार्यक्रमात धांगडधिंगा केल्याप्रकरणी त्याच्यावर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुणे शहरातील मोहोळ टोळीचा तो म्होरक्या आहे.शरद मोहोळविरोधात आता कलम 143, 188, 37 (3) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, 51 बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शरद मोहोळ 26 जानेवारीला ज्या कार्यक्रमाला हजर राहिला होता, त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळित ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गँगस्टर निलेश घायवळला कारवाईचा दणका दिला आहे. त्याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. निलेश घायवळ याला पुढील एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.याचबरोबर पुण्यातील आणखी एक कुख्यात गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेडमध्ये हायवा घुसला, झोपलेल्या कामगारांना चिरडले