पैसे गोळा करण्यासाठी पोलिस हेल्मेटसक्ती करत आहे!, खा. इम्तियाज जलील यांचा कडाडून विरोध

खा. जलील

औरंगाबाद : शहर सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे. हि वेळ हेल्मेटसक्तीची नाही. पैसे गोळा करण्यासाठी या गोष्टी पोलिसांना आत्ता सुचत आहे. असा कडक शब्दात खा. जलील यांनी हेल्मेटसक्तीला विरोध केला. पोलिसांकडून बुधवार पासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे हि ते म्हणाले.

शहरातील बहुतांश नागरिक घरात बसुईन आहे. अत्यवश्यक कारणांसाठी लोक बाहेर पडत आहे. आधीच प्रशासनाने दंड वसुलीचा नागरिकांवर भडीमार केला आहे. त्यात या सक्तीने लोकांची अत्यवश्यक कामे देखील खोळंबनार आहे. सध्या परिस्थिती किती लोकांकडे हेल्मेट आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही ते आता हेल्मेट आणणार कुठून? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

कडक निर्बंध, इंधन दरवाढ, औषधी, घर खर्च अशा कित्येक समस्यांना सामान्य नागरिक सध्या तोंड देत आहे. त्यातच अनेक जण घरी बसून आहे. हातावर काम करणाऱ्या लोकांकडे सध्या पैसे नाही. त्यात शासनाने विविध दंड आकारणी सुरु केली आहे. प्रशासन मूळ विषय सोडून वसुलीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत आहे. या सक्तीला विरोध असल्याचे इम्तियाज जलील यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलतांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या