पोलिसांचा कारवाई मोड ऑन; अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई

पोलिसांचा कारवाई मोड ऑन; अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई

औरंगाबाद : शहरात अवैध दारु विक्रीचे धंदे बोकाळले आहेत. त्यात एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर दारुचे अवैध धंदे सुरू असल्याचे धाडसत्रावरुन दिसून आले आहे. पोलिसांनी आता अवैध धंद्यांविरुध्द धडक कारवाया सुरु केल्या असून, नऊ ठिकाणी छापेमारी करुन १७३ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत दहा हजार ३८० रुपयांची दारु हस्तगत करण्यात आली आहे.

एमआयडीसी वाळुजमध्ये पोलिसांनी चार कारवाया केल्या आहेत. याशिवाय हर्सुल दोन तर जवाहरनगर, सातारा आणि सिडको येथे प्रत्येकी एक कारवाई अशा नऊ कारवाया पोलिसांनी केल्या. गुलाब खान वजीर खान (७३, रा. गारखेडा परिसर), हर्सुल पोलिसांनी एका महिलेला आणि बबलू चंदनलाल जैस्वाल (४५, रा. जटवाडा रोड) याला पकडले. याशिवाय सातारा पोलिसांनी विष्णु साहेबराव हिवाळे (३९, रा. एमआयटी महाविद्यालयाजवळ, बीडबायपास रोड) याला पकडले.

सिडको पोलिसांनी दिनकर विश्वनाथ थोरात (४३, रा. सुरेवाडी) याला तर एमआयडीसी वाळुज पोलिसांनी विनोद हिफत चव्हाण (४०, रा. जोगेश्वरी), सुधीर पांडुरंग बनकर (४०, रा. वडगाव कोल्हाटी), अरुण दत्तू चव्हाण (३०, रा. कमळापूर फाटा, रांजणगाव शेणपुंजी) आणि एका महिलेला ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या