बुवाबाजी करणाऱ्यास भेंड्यात रंगेहाथ पकडले

नेवासा / भागवत दाभाडे: नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील लांडेवाडी भागात राहणाऱ्या एका इसमास अंगारे – धुपारे ,करुन बुवाबाजीच्या माध्यमातुन फसवणुक करताना त्याचे स्वताःचे घरात दि .४ रोजी दुपारी २ वाजता पोलिसांनी रंगेहाथ पकडले .

याबाबत माहिती अशी की , अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या जिल्हा समितीकडे भेंडा येथील राजेंद्र बाबुराव काळे (वय ५७) याचे विरोधात तक्रार दाखल झाली होती . त्यावरुन समितीच्या अँड. रंजना गवांदे व छाया बंगाळ या काही समस्या घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणुन काळे याचेकडे ४-५ दिवसांपुर्वी येऊन गेल्या होत्या . त्यांना तुम्हाला यावर उपाय करुन देतो असे सांगुन त्यांना दि.४ रोजी तोडगा करण्यासाठी पुन्हा बोलावले होते. याबाबत त्यांनी नेवासा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवुन काळे यास पकडुन दिले.

त्यासाठी वुवाबाजी विरोधी समितीच्या राज्य अध्यक्ष अँड .रंजना गवांदे , चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते काँ. बाबा आरगडे , अनिसचे जिल्हा कार्यवाह प्रा .अशोक गवांदे ,अनिसचे कार्यकर्ते छायाताई बंगाळ , बी.के.चव्हाण , भाऊसाहेब सावंत , पोलिस उपनिरिक्षक हरिभाऊ माळी त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते. काळे याचे विरुध्द नेवासा पोलिस ठाण्यात वुवाबाजी विरोधात नुसार गुन्हा दाखल झाला आहे.Loading…
Loading...