पोलादपूर घाट दुर्घटना : कृषी राज्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव

टीम महाराष्ट्र देशा : महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आंबनेळी घाटात अपघातस्थळी भेट देण्यास सांगलीतून रवाना झाले आहेत. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्याने कृषी राज्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार या बसमध्ये ३३ प्रवाशी होते. या बस अपघातात ३२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, पाऊस व धुक्यामुळे मदत कार्याला अडथळा येत आहे. दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वर येथे फिरायला निघाले होते.

दापोली विद्यापीठ येथील ३० पेक्षा अधिक कर्मचारी महाबळेश्वर येथे विद्यापीठच्या बसने सहलीला निघाले होते. त्यावेळी पोलादपूर पासून 15 किमी अंतरावर आंबेनळी दरीत बस कोसळली. या दुर्घटनेत बसमधील ३2 प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केवळ एकच जन या दुर्घटनेतून बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. पोलादपूर पोलिस स्टेशन येथील संपूर्ण स्टाफ, महसूल विभाग, तसेच महाबळेश्वर येथील बचाव पथक आणि वैद्यकीय पथक हजर झाले आहे. ही बस दापोली येथील असल्याचे समजते.

कालच्या पावसात अमळनेरमधील दोघांचा मृत्यू