पुण्यात 22 शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा, भारती रुग्णालयात उपचार सुरू

टीम महाराष्ट्र देशा :- पुण्यातील कात्रज भागामध्ये दुपारच्या माध्यह भोजनातून २२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. कात्रज मधील रामभाऊ म्हाळगी शाळेतील विद्यार्थ्यांना भातातून विषबाधा झाली आहे. विद्यार्थ्यांसोबतच काही शिक्षकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधित विद्यार्थ्यांना भारती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थांना उलट्या, अतिसार याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तत्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज येथील या शाळेतील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी’च्या २१ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेने सकाळी १०च्या सुमारास शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ली. खातानाही त्यांना रॉकेलचा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तासाभराने त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेने तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४ दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणाऱ्या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे.

Loading...

1995 पासून देशभरात मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांची गळती कमी व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी ही योजना सुरू झाली. योजना सुरू झाली तेव्हा इयत्ता 8वीपर्यंतच्या मुलांना धान्य/डाळी दिल्या असत. त्यानंतर 2002 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अन्नपदार्थांऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे करण्यात आले. दरम्यान, शाळेतील स्वयंपाकी, निरीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकदा असे विषबाधेचे प्रकार समोर आले आहेत. म्हाळगी शाळेतील विद्यार्थ्यांना भारती रुग्णालयात दाखल केल्यानंतर पालकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली आहे. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले