कष्टकरी शेतकरी बापासाठी लिहिलेली मन हेलावणारी कविता

बाबा तुम्हाला समजूनी घेतांना

बाबा बघतांना तुम्हाला,
माझा मी न राहिलो…
तुमचं आम्हावरचं प्रेम समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो,
बाबा तुमचे डोळे पाणावलेले पाहुनी
माझ्या हृदयात मी रडतो,
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो…
अपेक्षेचं  झाड वाढवता तुम्ही
घालूनी त्याला प्रेम,
घेऊनी त्याची काळजी
करिता त्याचं सांभाळ
मगच होतो आम्ही लहानचं मोठं,
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो..
मोठं मोठं होताना
होतात आमच्याकडून चुका
झाकुनी त्या पदाराशी
करता आमचा सांभाळ,
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो…
घालूनी स्वतः फाटके तुटके कपडे
करीता आमच्यासाठी
होळी दिवाळी सण साजरे,

बाबा तुम्हाला समजूनी घेतांना

माझा मी न राहिलो…
राबूनी कडक उन्हातान्हात
घेता खूप मेहनत,
बघावयास येतो जेव्हा मी शेतात
तेव्हा देता तुम्ही तुमचा शेला माझ्या कानास
आणि म्हणता,
बांध कानाला लागेल तुला ऊन,
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो…
लपवूनी तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंचा ओघ,
पुसता आमचे अश्रु आणि बोलूनी जाता,
हवं ते कर बाळा मी पाठीशी आहे,
तेव्हा किती वाटतोय मला हा हेवा ,
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो…
किती करू मी
बाबा तुमचे वर्णन
येतायत माझे डोळे भरून
दिसत आहे तुमची
प्रतिमा या कवितेतून
बाबा तुम्हाला समजूनी घेतांना
माझा मी न राहिलो……

 

कवी –  विजय गजानन जाधव
[email protected]