fbpx

पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात

टीम महाराष्ट्र देशा : आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची बसला अपघात झाला असून त्या अपघातात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

या बसमध्ये एकूण चौदा मुले होती. हा अपघात शाळेच्या शेजारीच झाल्यामुळे गर्दीची वेळ असल्याने लगेचच मदतीसाठी आजूबाजूचे नागरिक धावले व बस मध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढले.किरकोळ जखमी झालेल्या तीन मुलांना वेळीच प्रथमोपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर पोलीस देखील घटनास्थळी पोहचले.