fbpx

मोदीने चुना लावल्यानंतर पीएनबीला जाग; कर्जवसुलीसाठी गांधीगिरी अभियान

pnb bank

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुलीसाठी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. निरव मोदीने पीएनबीला १३ हजार कोटीचा चुना लावल्यानंतर आता बँकेला जाग आली असून कर्जवसुलीसाठी बँकेने विशेष अभियान राभावल आहे. १५० कोटी रुपयांच्या कर्जवसुलीचं लक्ष बँकेने ठेवले आहे.

कर्ज वसुलीसाठी पीएनबीचे कर्मचारी कर्जाची परतफेड न करणाऱ्यांच्या कार्यालयात फलक घेऊन बसतात. पैसे बुडवणाऱ्यांना स्वत:ची लाज वाटेल आणि ते कर्जाची परतफेड करतील, अशी आशा पीएनबीला आहे. पीएनबीची ही मोहीम एक वर्ष चालणार आहे.

बँकेने प्रसिद्धीपत्रकातून कर्जदारांशी चर्चा, त्यातून दर महिन्याला १०० ते १५० कोटी रुपयांचं कर्ज वसूल व्हाव म्हणून गांधीगिरी अभियान राभावले असल्याचे सांगितले आहे. बँकेने कर्ज बुडवणाऱ्यांची यादी तयार केली. यामध्ये १,०८४ लोकांच्या नावांचा समावेश असून यातील २२० जणांचे फोटो वर्तमानपत्रात सुद्धा प्रसिद्ध केले आहेत. कर्जाची परतफेड न करणाऱ्या १५० जणांचे पासपोर्ट गेल्या काही महिन्यांमध्ये जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती दिली आहे.