पीएनबी बँक घोटाळा; नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस

nirav modi and punjab national bank fraud

नवी दिल्ली : पीएनबी बँक भ्रष्ट्राचार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी फरार झाले होते. त्यांच्या विरोधात विविध तपास यंत्रणा सध्या चौकसी करत आहेत.

नीरव मोदीविरोधात अंमलबजावणी संचलनालयानं प्रत्यार्पणाची कारवाई सुरू करण्यास परवानगी दिली होती. ईडीनं सोमवारी प्रत्यार्पणासंबंधी अर्जही दिला होता. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चौकसी विरोधात अनेक सरकारी यंत्रणा तपास करत आहेत. ईडीनं त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला होता.

ईडीचे वकील हितेन वेंगावकर या प्रकरणातील आदेशाला परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवणार आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय तोच आदेश ब्रिटिश सरकारला पाठवेल. तपास यंत्रणांनी इतर देशांनाही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासंबंधी अर्ज पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

होय ‘त्या’ बदल्यात लाच मिळाली; पीएनबी माजी व्यवस्थापकाची कबुली