पीएमटी बसचा अचानक दरवाजा तुटला 

युवकाला दुखापत 
पुणे : शहरातील पीएमटी बसची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे .आज चक्क एका बसचा दरवाजा तुटल्याने एक युवक जखमी झाला . युवकाला गंभीर दुखापत झाली नसली तरी मोडकळीस आलेल्या बसेस ने यापुढे प्रवास करावा की नाही याचा विचार करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे .
मनपा पीएमटी स्टॉप वरून निघालेली  R ४०१  धाणोरी-लोहगाव बसचा विश्रांतवाडी जवळील साठे स्टॉप जवळ बसचा दरवाजा अचानक तुटला.  त्यामुळे एका तरूणाला दुखापत झाली आहे. बसचा अचानक दरवाजा तुटून पडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे.या घटनेमुळे प्रवाश्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली
मी या बसमधून आज प्रवास करीत होते. खराब झालेल्या बसची लवकर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच ज्या बस रोडवर धावण्या योग्य नाहीत त्या बस रोडवर आणू नये. जणेकरुण अपघात टळतिल. आज बसचा अचानक दरवाजा तुटल्यामुळे प्रवाशांमधे भीतीचे वातवरण होते.
आरती चव्हाण, विद्यार्थिनी