‘केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा’

modi sad

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. तसंच या पॅकेजमध्ये शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यातल्या तरतुदीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार दिवस पत्रकार परिषदही घेतली.

याचाच धागा पकडत कॉंग्रेस मात्र केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे,’ असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. याबाबत चे वृत्त पीटीआयने दिलं आहे.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सगळ्या विरोधी पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. त्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, ‘सध्या करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. तसेच अम्फान या चक्रीवादळाचाही फटका बसला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत करोनामुळे जी स्थिती निर्माण झाली ती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरलं असल्याचा आरोप त्यांनी केला.