पुणे महानगर विकास प्रधिकरणाने नवे शहर उभारण्याचा विचार करावा – गडकरी

Union Minister Nitin Gadkari

पुणे- मुंबईच्या विस्तारानंतर नवी मुंबई हे एक नवे शहर उभे राहिले असून, त्याचप्रमाणे पुणे महानगर विकास प्रधिकरणाने पुणे-अहमदनगर किंवा पुणे-मुंबईदरम्यान नवे शहर उभे करण्याचा विचार करावा, असा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे.

पीएमआरडीएकडून तयार केल्या जाणाऱ्या रिंगरोडसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची व केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्य घ्यावे. तसेच भूसंपादनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही आवाहन गडकरी यांनी या वेळी केले. पुणे विभागीय राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत गडकरी बोलत होते.
तसेच पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी १३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.रिंगरोड भूसंपादनासाठी केंद्र शासनाने निधी द्यावा, अशी मागणी या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांच्याकडे केली.

Loading...

मात्र, एका राज्याला भूसंपादनास एवढा निधी दिला, तर देशातील सर्व राज्यांना द्यावा लागेल, असे गडकरी म्हणाले. त्यावर ९ हजार कोटी राज्य शासनाकडून उभा केला जाईल. उर्वरित ४ हजार कोटी केंद्राने द्यावे, असेही फडणवीस यांनी यावेळी सूचविलेयाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आदी उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रावसाहेब दानवेंचे जावई मनसेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीला
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा