पुणे मेट्रोला ‘पीएमआरडीए’ची मंजूरी

मुंबई:पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास अर्थातच शिवाजीनगर-हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पास मंजूरी मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण समितीच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.यावेळी पालकमंत्री गिरीष बापटही उपस्थित होते.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच (शनिवार) पुणे मेट्रोच्या पहिल्या ट्प्प्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन मार्ग येतात.

मार्ग शिवाजीनगर ते हिंजवडी

  • मार्गाची एकुण लांबी – 23 किलोमिटर
  • मार्गादरम्यान एकुण 23 स्थानकं असतील.
  • या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार ९४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • एप्रिलपर्यंत या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.
  • चार वर्षात हा प्रकल्प मार्गी लावण्याचा सरकारचा मानस.

 

You might also like
Comments
Loading...