fbpx

पीएमपीएमएलचा प्रवास महागला

Tukaram-mundhe pmpml

पीएमपीएमएलच्या मासिक पासचा दर 1200 रुपयांवरून 1400 रुपयांवर करण्यात आला आहे.त्यामुळे पीएमपीएमएलने दररोज प्रवास करणा-या प्रवाशांच्या प्रवास महागणार आहे . नवीन बदल करताना हद्दीतील व हद्दीबाहेरील असे दोन प्रकार रद्द करण्यात आले असून आता संपूर्ण पुण्यासाठी एकच पास ठेवण्यात येणार आहे. याचा दर 1400 रुपये ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दरवाढीमुळे प्रवाश्यांच्या खिशाला दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे.

 

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

पीएमपीएमएल पुढील दीड पर्यावरणपूरक वर्षात ८०० बसेस घेणार .

आठवड्याचा पास रद्द

एचआयव्ही ग्रस्तांना मोफत पास

विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांना दंड 300 रुपये दंड आकारणार ; या आधी हा दंड 100 रुपये होता.

पासचा गैरवापर करणा-या प्रवाशांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल ; यापूर्वी 250 रुपये दंड होता

1 Comment

Click here to post a comment