पीेएमपीएमएलच्या 200 बसला ब्रेक : चालक अचानक संपावर

PMPML, Pune

पुणे: पुणे महानगर परिवहन मंडळाचे दोनशे बस चालक आज सकाळीपासून अचानक संपावर गेले आहेत. हे सर्व चालक कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या बसवरील आहेत.

पीएमपीकडून काही खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्वावर बसेस घेण्यात आलेल्या आहेत. या ठेकेदारांची भाड्याची रक्कम गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. पीएमपीकडून मिळणारे पैसे थकल्याने ठेकेदारांकडून बस चालकांचे वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे वेतनाची रक्कम मिळावी म्हणून चालक अचानक संपावर गेले आहेत.

पीएमपीएलकडून घालण्यात येणारे नियम मोडल्याने ठेकेदारांना कोट्यवधीचा दंड बाजावन्याय आलेले आहे. तर दुसरीकडे पीएमपी कडे थकीत असलेले रक्कम वेळेत मिळत नसल्याने ठेकेदार त्रस्त झाले आहेत. या मुळे ठेकेदाराकडून चालकांचे या महिन्यात वेतन करण्यात आले नाही त्यामुळे संप पुरकरण्यात आला आहे.