संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदी करिता पीएमपीएलच्या 124 जादा बसेस

पुणे : कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीएलतर्फे 124 ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नियमीत 65 बस व जादा 124 अशा एकूण 189 बसेस सोडण्यात येणार आहेत.

या बसेस 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. यासाठी आळंदीचे सध्याचे बसस्थानक तात्पुरते बदलून ते च-होली फाटा येथून संचलीत करण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, स्वारगेट, भोसरी, निगडी, रहाटणी, देहुगाव, म.न.पा भवन, हडपसर, पुणे स्टेशन या ठिकाणावरुन या बसेस सुटणार आहेत.

दहा बसस्थानकावरुन 13 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत जादा बसेस धावणार आहेत. तसेच या जादा बसेसना रात्री दहानंतर बस प्रवास करत असताना नेहमीच्या गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा 5 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. याबरोबरच या कालावधीत रात्री 11 नंतर ज्येष्ठ नागरिक, मासिक, साप्ताहिक, एकदिवसीय असा कोणत्याच पासचा लाभ नागरिकांना घेता येणार नाही.

दरम्यान, मनपा बहुळगाव हा मार्ग या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वाघोली- आळंदी या मार्गावरील बस मरकळ रोडवरील लक्ष्मी कार्यालय येथून सुटतील. तरी प्रवाशांनी वरील बदल तसेच ज्यादा गाड्यांचा लाभ घेत सहकार्य करावे असे आवाहन पीएमपीएल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

You might also like
Comments
Loading...