fbpx

पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

pmpl

पुणे : यंदाच्या दिवाळीत पीएमपी कर्मचा-यांना वेळेत बोनस मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनससाठी लागणारी रक्कम पीएमपीला अदा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनससाठी प्रत्येक वर्षी आंदोलनाचे अथवा संपचे हत्यार उपसावे लागत होते. यंदा मात्र कर्मचा-यांना आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. कारण झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान यासाठी लागणारी रक्कम पीएमपीला अदा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. यामुळे पीएमपीच्या ७००० हजार कर्मचारी आणि ५६ अधिकाऱ्यांना वेळेत बोनस मिळण्याची शक्यता आहे.