‘पीएमपी’ पदभरती, पदोन्नतीची नियमावली तयार

pmpml

पुणे    – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) नवीन आस्थापना आराखड्यातील पदभरती, पदोन्नतीबाबतच्या अटी व शर्तींची नियमावली तयार केली आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने नियमावली पीएमपीतर्फे तयार करण्यात आली असून, त्यामध्ये ११ हजार ३८४ पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पीएमपीच्या ९ फेब्रुवारीला होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही नियमावली मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘पीएमपी’च्या निर्मितीनंतर दहा वर्षे आस्थापना आराखड्याचे काम रेंगाळले होते. आराखडा नसल्याने कर्मचारी भरती, पदोन्नती तसेच प्रशासकीय कामकाजात अडथळे येत होते.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी या आराखड्याला अंतिम स्वरूप दिले असून, त्याची काही अंशी अंमलबजावणीही सुरू केली आहे. यामध्ये ११ हजार ३८४ पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. सरळभरतीने तसेच खातेअंतर्गत भरावयाच्या पदसंख्या, पदोन्नतीसाठीच्या अटी व शर्तींबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली मंजुरीसाठी ९ फेब्रुवारी रोजी होणा-या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Loading...

नवीन सेवा नियमावलीमध्ये काही नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. तर काही पदांच्या नावातही बदल केला गेला आहे. एकूण ५९ संवर्गामध्ये ११ हजार ३८४ पदांचा आकृतीबंद तयार करण्यात आला आहे. यामध्ये ४८०० वाहक व ३८४० चालकांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. रोजंदारी, सरळ सेवा तसेच प्रतिनियुक्ती या माध्यमातून विविध पदे भरली जाणार आहेत. सर्व कर्मचारी व अधिका-यांची कामाची जबाबदारी व कर्तव्यही निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणीही केली जाणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?
तुम्ही काय केलं ते आधी सांगा;शिवेसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर खडसे  म्हणतात...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार
मुंबईची माहिती नाही तेच 'नाईट लाईफ'ला विरोध करत आहेत - प्रकाश आंबेडकर
भागवत यांना किती मुलं आहेत हे मला माहित नाही; त्यांनी नसत्या उठाठेव करू नये