अखेर सशुल्क पार्किंग धोरणाला बहुमताच्या जोरावर मंजुरी; मात्र हा असणार महत्वपूर्ण बदल

pune corporation new parking policy

पुणे- पुणे महापालिका मुख्यसभेत सशुल्क पार्किंग धोरणाला सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली आहे. मात्र मूळ प्रस्तावानुसार सर्व शहरात पार्किंग धोरण न राबवता प्रथम निवडक पाच मार्गांवर ते राबवले जाणार आहे. तसेच धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समितीची नेमणूक करण्याचा निर्णय मुख्यसभेमध्ये घेण्यात आला आहे.

मागील आठवड्यामध्ये प्रशासनाकडून सुचवण्यात आलेले पार्किंगचे दर 80 टक्क्यांनी कमी करत दिवस-रात्र पार्किंग धोरणाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. मुख्यसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. मात्र, भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष तसेच शहरातील विविध संघटना आणि संस्थांचा होणारा विरोध पाहता दिवस – रात्र पार्किंग निर्णय मागे घेत पार्किंग पॉलिसीला मंजुरी देण्यात आली आहे.

दिवस आंदोलनांचा

पुणे शहरात नव्याने लागू करण्यात येणाऱ्या पार्किंग धोरण महापालिका सभागृहात मंजूर होण्याआधी आज दिवसभरात विविध पक्ष संघटनांकडून आंदोलन करत विरोध दर्शविण्यात आला.