स्मार्ट महापालिकेला पुणेकरांच्या ‘लाईक’ मिळेना; आता सगळी भिस्त कर्मचाऱ्यांवर

पुणे: भारतातले आयटी हब म्हणून पुण्याची ओळख आहे. तसेच पुणे महापालिकेला स्मार्ट महापालिका म्हणूनही ओळखल जात. मात्र आजही ‘सोशल मिडीया’वर पुणेकर महापालिकेला दाद देताना दिसत नाहीत. कारण कि तब्बल ३५- ४० लाख शिक्षित लोकसंख्या असणाऱ्या पुणे शहरातील महापालिकेच्या पेजला केवळ १० हजारच्या आसपास लाईक आहेत. तर ट्विटरवर 8152 लोक फॉलो करतात. आता नागरिकच लाईक करत नाहीत हे दिसल्यावर पालिकेतील 18 हजार कर्मचाऱ्यांना ऍक्टिव’ होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या सेवा-सुविधांचा प्रसार आणि प्रचार वेगाने व्हावा यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी फेसबुक पेजसह ट्विटर हॅंडल सुरू केले. महापालिकेच्या सोशल मिडियाचे कामकाज काही खासगी सल्लागार तसेच इतर कंपन्यांना पैसे देऊन हँडल करण्यास देण्यात आले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याच दिसत आहे.त्यामुळे आता पालिकेचा सोशल मीडिया ऍक्टिव्ह करण्याची भिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असनार आहे.