स्मार्ट महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; फायर ब्रिगेडचे चुकीचे नंबर सोशल मिडीयावर

पुणे: स्मार्ट पुणे महापालिकेचा आणखीन एक भोंगळ कारभार समोर आला आहे. शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या अग्निशमन केंद्रांचे चुकीचेनंबर महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅडलवरून वारंवार पोस्ट केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अग्निशमन कंट्रोलरूमला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रीट्विट करत नंबर चुकीचे असल्याच सांगूनही ते दुरुस्त करण्याची तसदी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात नाहीये.

Loading...

पीएमसी केअर नावाने महापालिकेचे अधिकृत ट्विटर हॅडल आहे. या हॅडलवरून ११ डिसेंबरला फायर ब्रिगेड स्टेशनच्या नंबरची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र यातील काही क्रमांक अनेक महीन्यांपासून बंद असल्याने संबंधित क्रमांक दुरुस्त करण्याचे रीट्विट अग्निशमन कंट्रोलरूमला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केले होते. मात्र या सूचनेकडे लक्ष देण्याची तसदी आयटी विभागाने घेतली नसल्याच उघड झाल आहे. कारण गुरुवारी म्हणजेच २७ डिसेंबरला पुन्हा एकदा असेच ट्विट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे दिवसेंदिवस पहायला मिळत आहेत. त्यातच आता आशा प्रकारे चुकीचेनंबर सोशलमिडीयावर टाकून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरु असल्याच दिसत आहे. मागील काही दिवसांत शहरात अनेक ठिकाणी बस तसेच वाहनांना आग लागण्याचा घटना वाढल्या आहेत. अशावेळी संबंधित नंबरवर कोणी फोन केल्यास चुकीचा क्रमांक असल्यामुळे काही अघटीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान याबद्दल महापालिका आयटी विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांना विचारल असता ‘ हे नंबर चुकीचे असल्याच आम्हाला माहित नव्हत, मात्र तत्काळ यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल’ अशी माहिती दिली आहे.Loading…


Loading…

Loading...