पुणे: भाजपच्या नावाला शोभणारे फसवे आणि भोंगळ बजेट – चेतन तुपे

पुणे: पुणे महापालिकेचे सन २०१८ -१९ साठीचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी आज मुख्यसभेत सादर केले. हे बजेट म्हणजे जुन्या योजनांना गती देणारे वास्तववादी असल्याचा दावा मोहोळ यांनी केला आहे. मात्र भाजपने आपल्या नावाला साजेसे फसवे अंदाजपत्रक मांडल्याची टीका विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी केली आहे.

स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आज मुख्यसभेत सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचे 5870 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 5397 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीकडून 473 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी हेच बजेट 5 हजार 912 कोटी होते. दरम्यान यंदा नव्याने कोणत्याही योजनांचा समावेश करण्यात आलेला नसल्याने जुन्या योजनांना नवीन मुलामा लावण्यात आल्याच दिसत आहे. त्यामुळे विरोधीपक्षांनी देखील सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

विरोधीपक्ष नेते चेतन तुपे म्हणाले कि, भाजपने आपल्या नावाला साजेसे फसवे आणि भोंगळ बजेट सादर केले आहे. यामध्ये करण्यात आलेले दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत. सगळ्या जुन्या योजना नवीन स्वरुपात मांडल्या आहेत. बजेटमध्ये एकही नवीन योजना नाही तसेच जीएसटीमधून येणाऱ्या उत्पन्नाचा आकडा देखील वाढवून दाखवण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...