पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात आधी पाणी गळती आणि आता पडला लाकडी ठोकळा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. या घटनेला तीन महिन्याचा कालावधी झाल्यानंतर आज कामकाजाला सुरुवात झाली. मात्र यावेळी काही नगरसेवकाचं सभागृहात भाषण सुरू असताना अचानक वरून लाकडी ठोकळा पडल्याची घटना घडली. यामुळे सभागृहाचे काम नेमके कशा पद्धतीने करण्यात आले आहे असा प्रश्न निर्माण झाला. दुसरीकडे सभागृहात वरून काही वस्तू पडतील अशी भीती व्यक्त करत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक योगेश ससाणे सभागृहात हेल्मेट घालून बसले.

पुणे महानगरपालिकेचच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याची टीका वारंवार होत आहे. 21 जूनला या सभागृहाचे उदघाटन उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं होतं. त्यावेळी हे सभागृह पावसाच्या पाण्याने गळल्याने सत्ताधारी भाजपला चांगलंच तोंडघशी पाडाव लागलं होतं.

मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या निकृष्ट कामाबाबत अनेक वादानंतर आज अखेर कामकाजाला सुरुवात झाली.मात्र , नवीन सभागृहात पहिलीच सर्वसाधारण सभा सुरू असतानाच अचानक सभागृहात एक लाकडी ठोकला पडला. सुदैवाने हा लाकडी ठोकळा नगरसेवक बसतात त्या जागेच्या थोडा पुढे पडल्याने कोणालाही इजा झाली नाही.

अशातच आता पहिल्याच सभेत ठोकला पडल्याने भाजपला विरोधकांनी कोंडीत पकडलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे सभागृहात चक्क हेल्मेट घालून बसले होते.

चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या

You might also like
Comments
Loading...