स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची लाजिरवाणी घसरण ; सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची विरोधकांची टीका

पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले पुणे शहर या वर्षी ३७ व्या क्रमांकावर गेले. या सर्वेक्षणात राज्यातही पुणे शहराने गेल्या वर्षीचे दुसरे स्थान गमावले आहे. राज्यात या वर्षी शहर आठव्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या दृष्टीने अतिशय शरमेची बाब असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

याच मुद्द्यावरून महानगरपालिकेतील विरोधीपक्षनेते दिलीप बराटे यांनी पालिका आणि प्रशासनाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. ३७ व्या क्रमांकावर पुण्याचे असणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका पुणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी लागणारी ११ हजार कागदपत्र महापालिका प्रशासनाने पाठवल्याचे असल्याचं सांगितले जात आहे. जर कागदपत्रांची पूर्तता झाली असती तर ही घसरण झालीच नसती असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पालिकेच्या पैशांची उधळपट्टी ससत्ताधारी पक्षाचा प्रचार करण्यासठी वापरत बसले त्यामुळेच ही घसरण झाल्याचा आरोप बराटे यांनी केला आहे.

Loading...

दरम्यान, याबाबत सजग नागरिक मंचाने, ”पुणे महापालिकेने या स्पर्धेसाठी सल्लागारांसह अनेक दिखाऊ बाबींवर पुणेकरांच्या करांच्या पैश्यातून केलेल्या खर्चाचा लेखा जोखा जाहीर होण्याची तसेच या अपयशासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील