पीएमपीएमएलला वर्षाला ५० कोटी देऊनही पास दरवाढ कशासाठी..??

पास दरवाढी पोटी महापालिका प्रशासन पीएमपीएमएलला अदा करते तब्बल ५० कोटी रुपये

पुणे :पीएमपीएमएल प्रशासन व पुणे पालिकेमधील पास दरवाढी वरुन चालू असलेला वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. पासमधील सवलतीपोटी महापालिका पीएमपीएलला दरवर्षी तब्बल ५० कोटी रुपये जमा करीत असते, तरीही पीएमपीएलने शालेय विद्यार्थी पास व ज्येष्ठ नागरिक पास मधील भाड़े वाढ कमी का करत नाही असा सवाल उपस्थित
झाला आहे .
५० कोटी रक्कमेची मागणी पीएमपीएल प्रशासन बरोबर वर्ष संपले, की महापालिकेकडे करीत असते व त्याचा पाठपुरावाही करून पैसे पदरात पाडून घेत असते.ज्येष्ठ नागरिकांना आधी ४५० रुपयांमध्ये मिळत असलेल्या पाससाठी आता ७५० रुपये द्यावे लागत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ६०० रुपये द्यावे लागत होते तिथे आता ७५० रुपये द्यावे लागतात त्याचबरोबर जवळ रूट साठी तर पासच बंद  करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांवर रोजच्या1रोज टिकिट काढन्याची नामुष्की आली आहे.
पीएमपीएमएल जे दैनंदिन पास योजना लागू करत आहे त्याचा1होणारा भुरदंड देखील पालिका प्रशासनाच्या खिशतुन द्यावा लागत आहे. तरी देखील पीएमपीएमएल ने पास दरवाढ कमी करण्या बाबत कोणताही ठोस निर्णय घेत का नाही असा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे, तसेच त्या वाढीला महापालिका पदाधिका-यांनी केलेल्या विरोधाची दखलही पीएमपीएल प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
bagdure
महापालिकेनकडून एवढी रक्कम देउन ही दरवाढ का करण्यात आली समजत नाही. ती मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली, मात्र त्याकडे दुर्लक्ष दिले आहे. आम्ही मुंढे यांची पुन्हा भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत विचारणा करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी जास्तीत जास्त सवलती द्याव्यात ही आमची मागणी आहे.
मुरलीधर मोहोळ,
अध्यक्ष, स्थायी समिती,
महापालिका
You might also like
Comments
Loading...