कमलामील आगीनंतर पुणे महापालिकेला जाग; शहरातील व्यवसायिक मिळकतींचे करणार फायर ऑडीट

pmc

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर आता पुणे महापालिकेला जाग आली असून शहरातील व्यवसायिक मिळकतींचे फायर ऑडीट करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.

Loading...

पुणे शहरात हजारो हॉटेल्स तर शेकडो पब आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पार्किंग तसेच टेरेसवर अनधिकृत रेस्टॉरंट चालवले जात आहेत. आजवर याकडे दुर्लक्ष केले गेल्याच दिसत आहे . मात्र आता ‘पुढच्यास लागे मागचा शहना होई’ या म्हणी प्रमाणे रहदारी आणि वास्तव्य असणाऱ्या व्यवसायिक मिळकतींचे फायर ऑडीट पालिकेकडून केले जाणार आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी अग्निशमन अधिकारी, शहर अभियंता आणि आरोग्य प्रमुख यांना याबद्दलचे आदेश दिले आहेत. १५ जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करून संपूर्ण आहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे.Loading…


Loading…

Loading...