अखेर महापालिकेचे वर्ल्ड रेकॉर्ड ढोल वादन रद्द!

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेला ढोल वादानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ यांनी या बाबतची माहिती दिली आहे.

विघ्नहर्ता गणरायाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवा निमित्त यंदा पुणे महापालिकेने दिमाखदार सोहळा आयोजित करण्याचा घाट घातला होता. मात्र सुरुवाती पासूनच महापालिकेचे नियोजन चांगलेच फसल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्वात प्रथम प्रचार-प्रसिद्धीसाठी नेमलेल्या खासगी जनसंपर्क संस्थेवरून मोठे वादंग झाले. त्यांनतर आयोजित करण्यात आलेल्या बाईक रैलीचा फज्जा उडाला. पुण्याच्या गणेशोत्सवाची महती सांगण्यासाठी तयार करण्यात आलेला गाणे विसर्जन दिवशी प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे गाणे सर्वांपर्यंत पोहोचलेच नाही. तर आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी असा ढोल वादानाचा आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.