पीएमसी बँक खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

blank

टीम महाराष्ट्र देशा : आर्थिक अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत.

आज आरबीआयने 40 हजारांव्यतिरिक्त आणखी 50 हजार रुपये काढण्याची मुभा दिल्याचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी सांगितले. पीएमसी बँकेतून पहिल्यांदा महिन्यांत केवळ 10 हजारच काढता येत होते. तर आरबीआयने विरोध पाहून ही रक्कम 40 हजारावर करण्यात आली होती.

मात्र, 50 हजार रुपये काढण्यासाठी काही अटीं लागू करण्यात आल्या आहे. वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढू शकणार आहेत. यासाठी बँकेमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे दिल्यास हे पैसे मिळू शकणार आहेत.

दरम्यान, पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेत (पीएमसी) पैसे अडकले असल्याने अनेकांवर संकट कोसळलं असून एका खातेधारकाचा मृत्यू झाला आहे. ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला. संजय गुलाटी ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधील पीएमसी बँकेच्या शाखेत त्यांचं खातं होतं. जवळपास ९० लाख रुपये त्यांचे बँकेत अडकले होते.

महत्वाच्या बातम्या