PMC बँकेवर रिझर्व बँकेचे निर्बंध, खातेदारांच्या अडचणी वाढल्या

blank

टीम महाराष्ट्र देशा : आर्थिक अनियमितता आढळून आल्याने रिझर्व बँकेने पंजाब अॅन्ड महारष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेने बॅंकेवर प्रॉम्ट करेक्टीव्ह ऍक्शन घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आरबीआयने पंजाब अॅन्ड महारष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेवर कलम ३५ अ अंतर्गत हे निर्बंध लादले असल्याने बँकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे नियम सोमवारी (ता. २३) पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. या निर्णयांतर्गत बँक खात्यातून मर्यादित रक्कमच काढता येते. रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध लादल्यामुळे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी खातेदारांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

प्रॉम्ट करेक्टीव्ह ऍक्शन म्हणजे काय ?

जेव्हा एखाद्या बँकेकडे जोखीम पत्करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते. तसेच कर्जाच्या पैशातून उत्तपन्न मिळत नसेल तर आरबीआय त्या संबधित बँकेला पीसीए मध्ये ठेवतात. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा बँकेवर पीसीए अंतर्गत निर्बंध लादले जातात. बँक अश्या परिस्थितीतून जात आहे हे कळण्यासाठी रीझर्व्ह बँकेने सीआरएआर, नेट एनपीए आणि रिटर्न ऑन अॅसेट सारखे
काही निर्देशक तयार केले आहेत.

महत्वाच्या बातम्या