पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दलाचे पैसे चोरले – राहुल गांधी

रांची : भारतीय हवाईदलाचे वैमानिक देशा सुरक्षित रहावा म्हणून जिवाची बाजी लावत आहेत. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच हवाईदलाच्या वाट्यातील पैसे चोरून उद्योगपती अनिल अंबानींना देत आहेत, असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते रांची येथील मोरहाबादी मैदानावर आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला केला.

यावेळी राहुल  म्हणाले, कधी काळी सरकारसाठी जनता ‘अच्छे दिन आयेंगे’ अशा घोषणा देत होते, आता मात्र तीच जनता ‘चौकीदार चोर है’, असल्याची घोषणा देत आहे. आता परिस्थिती बदलली आहे.

केवळ हवाईदलच नाही तर शेतकरी आणि आदिवासींच्या कोट्यातील पैसेही पंतप्रधान चोरतात. शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनीच्या संरक्षणासाठी कॉंग्रेसने २०१३ मध्ये जमीन अधिग्रहण कायदा आणला होता, मात्र झारखंडमध्ये त्यांचीच जमीन बळकावून उद्योगपतींना देण्यात आली. पाणी, जंगल आणि जमीन ही शेतकऱ्यांची आहे, अंबानी-अडानी यांची नाही. असेही राहुल म्हणले.Loading…
Loading...