fbpx

विशेष मुलाखत : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या साडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी यांनी मुलाखतीने केली आहे. मोदींनी ANI या आघाडीच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल आहे. या मुलाखती मध्ये त्यांनी राममंदिर, सर्जिकल स्ट्राईक अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.

सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या वर्षात पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राम मंदिर हे घटनेनुसारच तयार होईल. न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश येणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलंय.

वृत्तसंस्था एएनआयला मोदींनी ही मुलाखत दिली आहे. देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना या निवडणुकींत काय मुद्दे असणार याकडे देशाच लक्ष आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धमाका करणार असून लोकसभा निवडणुकीत काय मुद्दे असणार याची झलक देणार आहेत.

देशाच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना पंतप्रधान मोदी आज उत्तर देणार असल्याने सगळ्या देशाचे लक्ष मोदींच्या या अक्शन प्लॅॅन मुलाखातीकडे लागले आहे.