कोरेगाव-भीमा प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाचा हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

दिल्ली : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीनंतर संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्या अटकेची मागणी करत प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट बंद ची घोषणा केली होती.  प्रकाश आंबेडकरांनी आता थेट कोरेगाव-भीमा प्रकरणात पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिल्ली येथील एका पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले कोरेगाव-भीमा प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत आहे. म्हणूनच संभाजी भिडे यांना अटकपूर्व जामिनाची चिंता नाही. असंही ते म्हणाले. दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र यानंतर पंतप्रधान कार्यालयानं या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.