जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प हाती घ्यावे लागतात ; मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल

वेबटीम : आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनवरून आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेला सामोर जाव लागत आहे.

बुलेट ट्रेनचा फायदा झाला नाही, तरी जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन सारखे मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. असं विधान मोदींनी केलं होतं. ज्यावेळी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केल होत.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरुन मोदींचा हा जुना व्हिडिओ अपलोड करुन फक्त दिखाव्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला आहे.