ब्रेकिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नींच्या गाडीला अपघात ; एकाचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. कोट्टा-चितौड महामार्गावर हा अपघात झाला. जसोदाबेन या अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

कोटा-चित्तोर महामार्गावर झालेल्य या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. राजस्थान पोलिसांनी ही माहिती दिली. जशोदाबेन यांना चितौडगड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन या सुरक्षित असून अपघातानंतर स्वतः चालत पोलिसांबरोबर गाडीत बसल्या आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.

You might also like
Comments
Loading...