VIDEO- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्‍ली मेट्रो मजेन्‍टा लाइनचे उद्घाटन

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थीतीत दिल्लीतील कालीकाज ते नोयडाच्या बॉटेनिकल गार्डनपर्यंतच्या नव्या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं  कौतुक केलं.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सरकार विकासाची कामं अतिशय जलद गतीनं करत आहे. त्यांच्या पेहराव्यावरुन अनेकवेळा भ्रम पसरवला जातो की, ते अतिशय रुढवादी, परंपरावादी आहेत. पण मला आनंद वाटतो की, ज्या नोयडात येण्याची हिम्मत यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्याच नोयडात येऊन योगी आदित्यनाथ यांनी सर्व अंधश्रद्धांना मुठमाती दिली आहे.”

pm-modi-and-ups-cm-yogi-to-launch-delhi-metro-magenta-line-today