कलम ३७० रद्द केल्यामुळेच भारताचा डंका जगभर वाजतोय – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा;- राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पुण्यात पार पडली.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुणे शहर क्रांतीकाराची आणि समाजसुधारकांची नगरी असून या शहरातून देशाला संस्कारासोबत स्टार्टअपही मिळते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याचे  वर्णन केले.पंतप्रधान म्हणून जगभराक फिरताना १३० कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मान मिळतो, असे सांगत त्यांनी जनादेशात मोठी ताकद असल्याचे सांगितले.

शहाराच्या विकासाबाबत ते म्हणाले की, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कनेक्टिव्हिटीचा प्रश्न होता. त्यासाठी पुणे ते पंढरपूर महामार्गासारखी मोठी कामे सरकारने हाती घेतली आहेत. आगामी ५ वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही ते यावेळी मोदी म्हणाले.

तसेच संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतो आहे याचं कारण आहे ते म्हणजे अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भविष्यासाठी आम्ही निर्णय घेतला. गेल्या सत्तर वर्षांपासून अनुच्छेद ३७० हे या जम्मू काश्मीरच्या विकासातला अडथळा होतं. हा अडथळा दूर करण्याच्या बाता अनेकांनी मारल्या पण कोणीही हिंमत दाखवली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी सांगितले .

महत्वाच्या बातम्या