2019 ला मी बघून घेईन ;स्वपक्षातील खासदारांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

pm-modi

वेबटीम : भाजप अध्यक्ष अमित शहा यांची राज्यसभेत एंट्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत खासदारांची शाळा घेतली आहे. या बैठकीत मोदींनी खासदारांना तंबी दिली असून . ‘आता अध्यक्षच राज्यसभेत आले आहेत. तुमच्या मौजमजेचे दिवस बंद होणार आहेत,’ या शब्दांमध्ये मोदींनी खासदारांची ‘शाळा’ घेतली.

दिल्लीमध्ये पार पडलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला पंतप्रधान मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा  यांच्यासह भाजपचे खासदार उपस्थित होते.संसदेच्या कामकाजात जाणवणारी भाजप खासदारांच्या अनुपस्थिती यावर मोदींनी संताप व्यक्त केला.

काय म्हणाले मोदी?
‘तुम्ही स्वत:ला काय समजता? तुम्हीच काय, मीदेखील काहीच नाही. भाजप एक पक्ष आहे. ‘तीन ओळींचा व्हिप काय आहे? वारंवार व्हिप का जारी करावा लागतो? संसदेत हजर राहण्याच्या सूचना का द्याव्या लागतात?,’ असे अनेक प्रश्न मोदींनी खासदारांची शाळा घेताना उपस्थित केले.‘आता अध्यक्षच राज्यसभेत आले आहेत. तुमच्या मौजमजेचे दिवस बंद होणार आहेत.‘ज्याला जे वाटतेय, त्याने ते करावे. मी २०१९ मध्ये बघून घेईन,’ अशा कडक शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी खासदारांना खडसावले आहे.