भाजपला मित्रपक्षांसह सरकार चालवण्याचा अनुभव, मोदींच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण

टीम महाराष्ट्र देशा: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळेल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत. शिवसेना, अकाली दल,जदयु सारख्या मित्रपक्षांची साथ देखील भाजपला मिळाली आहे, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानामुळे सध्या राजकीय चर्चांना उधान आले आहे.

मित्रपक्षांना सोबत घेवून सरकार कसे चालवायचे याचा अनुभव भाजपला आहे, यापूर्वी पक्ष संघटनेत काम करत असताना आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये मित्र पक्षासोबत काम केलं आहे. तसेच भाजपला अटलबिहारी वाजपेयी यांचा वारसा लाभला असून त्यांनी मित्र पक्षांना एकत्र घेत यशस्वीपणे सरकार चालवले, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

एका बाजूला भाजपकडून पुन्हा एकदा बहुमताचा नारा दिला हात आहे, दुसरीकडे मात्र सहाव्या टप्यातील मतदान सुरु असताना नरेंद्र मोदींच्या विधानामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपला एकहाती सत्ता येण्याची शक्यता नसल्यानेच मोदी यांनी विधान केल्याचं बोलले जात आहे.

प्रादेशिक पक्ष ठरणार दिल्लीत किंगमेकर, पवार, रेड्डी, राव, ममतांची निर्णायक भूमिका 

सध्य परिस्थितीमध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेमध्ये प्रादेशिक पक्ष किंगमेकरची भूमिका निभावू शकतात. पश्चिम बंगलामध्ये ममता बॅनर्जीचा तृणमूल कॉंग्रेस, तेलंगानामध्ये टीआरएस, आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर कॉंग्रेस, ओडीसामध्ये बिजू जनता दलाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या सर्व पक्षांनी अजूनही कोणासोबत जाणार हे स्पष्ट केलेलं नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

२०१४ साली पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागांपैकी ३४ जागा तृणमूल कॉंग्रेसने जिंकल्या, तर ओडिशामध्ये २१ पैकी २० बिजू जनता दलाने, आंध्र प्रदेशात २५ पैकी ९ जागा वायएसआर काँग्रेसने, तेलंगणात १७ पैकी ११ जागा टीआरएसने जिंकली होत्या. म्हणजेच चार राज्यामध्ये एकूण १०५ पैकी ७४ जागांवर या चार पक्षांनी विजय मिळवला होता. यंदाही एवढ्याच किंबहुना अधिक जागा मिळवत तेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.