वर्ध्यात मोदींचे तुफानी भाषण पण सभेतील अर्ध्या खुर्च्या रिकाम्याच

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणातून मोदींनी विरोधी पक्षांची अक्षरशः पिसे काढली. मात्र, वर्ध्यातील मोदींच्या सभेत मोदी बोलत असताना अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या.

सभेसाठी 50 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. पंतप्रधान मोदींनी मात्र आपल्या भाषणात सभेला तुडूंब गर्दी असल्याचा उल्लेख केला. महाराष्ट्रात भाजपने लोकसभेची पहिली प्रचार सभा वर्ध्यामध्ये आयोजित केली होती. या सभेत बोलताना मोदींनी काँग्रेससह शरद पवारांवर आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. मात्र राज्यातील मोदींच्या सभेला घटलेली गर्दी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते.