‘परीक्षा पे चर्चा’ झाली.. आता पंतप्रधान मोदी ‘रोजगार पे चर्चा’ करणार का ?

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा २०२०’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं राहावं याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता पंतप्रधान मोदी आता युवा वर्गाशी रोजगारासंबंधात चर्चा कधी करणार का ? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला आहे.

दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे केलेले सगळे दावे फोल ठरले आहेत. प्रत्यक्षात, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला. तरूणांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला देण्यात आला. देशात बेरोजगारी लक्षणीयरित्या वाढली आहे. आहेत तेच रोजगार जात आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने रोजगारनिर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरूणांशी संवाद साधणे अपेक्षित आहे. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे.

Loading...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा 2020” या कार्यक्रमात 20 जानेवारी रोजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा तिसरा कार्यक्रम होता. सोमवारी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये सकाळी 11 वाजता कार्यक्रम सुरु होणार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार दिले तसेच काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत परीक्षेच्या ताणासंबंधी चर्चा देखील केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'