‘डबल इंजिन’ सरकारमुळे उत्तर प्रदेशची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली- नरेंद्र मोदी

‘डबल इंजिन’ सरकारमुळे उत्तर प्रदेशची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली- नरेंद्र मोदी

Narendra Modi

उत्तर प्रदेश: भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या ‘डबल इंजिन’ (‘Double Engine’)सरकारने उत्तर प्रदेशचा विकास केला असून आता उत्तर प्रदेश केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी कार्यक्रमात दिली आहे.

केंद्र आणि उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)या पूर्वीच्या सरकारने या राज्याला हीन वागणूक देऊन तेथील जनतेला अंधारात ठेवले. केवळ आश्वासने दिल्याने उत्तर प्रदेश विकासापासून वंचित राहिला असल्याचे म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.

दरम्यान नोएडा (Noida international airport)आंतरराष्ट्रीय विमानतळ २०२४ पर्यंत पूर्ण होणार असून ते उत्तर भारताचे व्यापारी प्रवेशद्वार असणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधा या आमच्यासाठी केवळ राजकारण नसून ते राष्ट्रीय धोरण आहे. कोणत्या प्रकल्पाची रखडपट्टी होणार नाही आणि ते अपूर्ण राहणार नाही याकडे केंद्र सरकारचे लक्ष राहणार असल्याची ग्वाहीही पंतप्रधान मोदींनी दिली आहे. ‘सबका साथ- सबका विकास, सबका विश्वास- सबका प्रयास’ असा नारा यावेळी मोदींनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या: