‘हा मोदी आहे जशाच तस उत्तर मिळेल’ ; पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावल

टीम महाराष्ट्र देशा : भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले होते , पण हा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाकिस्तानचे लष्करी अधिकारी फोनवर बोलायलाही घाबरत होते, असा खुलासा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते बुधवारी लंडनच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात बोलत होते.

सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानलाही याबद्दल कळवले होते. जेणेकरून या हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या सैनिकांचे मृतदेह त्यांना परत नेता यावेत. त्यासाठी आम्ही सकाळी 11 च्या सुमारास पाकिस्तानमध्ये फोन केला. मात्र, तेव्हा पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसह सर्वच अधिकारी प्रचंड घाबरले होते. त्यामुळे कोणीही माझ्याशी फोनवर बोलायला तयार नव्हते. अखेर दुपारी 12 च्या सुमारास आम्ही त्यांच्याशी बोललो व त्यानंतर ही माहिती सार्वजनिक केली असा खुला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.

सर्जिकल स्ट्राईकच्यानिमित्ताने आम्ही त्यांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर दिले, असे म्हणत हा मोदी आहे जशाच तस उत्तर मिळेल अस पंतप्रधानांनी पाकिस्तानला ठणकावल आहे.