‘मॅन वर्सेस वाइल्ड’ : १८० देशांच्या लोकांना मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळणार

blank

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या मालिकेच्या एका विशेष भागात दिसणार आहेत. आज रात्री 9 वाजता या भागाचं प्रसारण होईल. जिम कोर्बेट राष्ट्रीय उद्यानात चित्रित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा उदेश्य, पर्यावरण बदल आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. 180 देशांमध्ये हा विशेष भाग दाखवण्यात येईल.

बेअर ग्रिल्ससोबत मोदींनाही आपण स्टंट करताना पाहणार आहोत. ग्रिल्ससोबत मोदी त्या स्पोर्टी लूकमध्ये जंगलात फिरताना, बोटीने नदी पार करताना, झाडातून फिरताना, डोंगरावर चढताना दिसणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा अनुभव नवीन असणार आहे.

दरम्यान, डिस्कव्हरी चॅनलचा हा शो जगभर प्रसिद्ध आहे. जगातील अनेक भाषांमध्ये हा शो डब करुन दाखवला जातो. नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स यांचा हा खास भाग १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ मधील त्यांचा सहभाग हा प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठीचा असाच एक प्रयत्न आहे.

महत्वाच्या बातम्या