fbpx

मोदींचे मित्रच मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाले

rahul-gandhi-reaction-after-karnataka-floor-test

टीम महाराष्ट्र देशा : नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाल्याची घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. बुधवारी चंद्रपूर येथील जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते.

मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला 35 हजार कोटी दिले. हेच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असे राहुल यांनी म्हटले आहे.

जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. शेतकऱ्यांचे रक्षण होऊ शकेल, इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

1 Comment

Click here to post a comment