शरद पवारांच्या घरात शीतयुद्ध सुरु, अजित पवारांनी त्यांना ‘हिटविकेट’ केलं – मोदी

blank

टीम महाराष्ट्र देशा :शरद पवार हे हवा कोणत्या बाजूला वाहते हे ओळखतात, त्यामुळेच त्यांनी मतदानापूर्वीच निवडणुकीतून माघार घेऊन मैदानातून पळ काढला. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गृहकलह सुरु असून अजित पवार यांनी त्यांना हिट विकेट केलं आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात आयोजित सभेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातीलच असणारे शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री होते, मात्र तरीही राज्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत. भाजप सरकारने महाराष्ट्र आणि देशातील अनेक भागात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवत दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या सत्ताकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांनी लक्ष दिले नाही. आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे शरद पवार यांनी मावळात शेतकरी हक्क मागत असताना त्यांना गोळ्या घातल्याचा घणाघात नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. कॉंग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाच्या नावावर जनतेला लुटलं, असा आरोप देखील मोदींनी यावेळी केला.

मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

काँग्रेसने कोट्यवधी भारतीयांची मान शरमेने झुकवली, या पापातून काँग्रेसला कधीच मुक्ती मिळणार नाही, जनता काँग्रेसला धडा शिकवेल : मोदी

काँग्रेसने सातत्याने हिंदूंचा अपमान केला आहे: मोदी

सुशिलकुमार शिंदेच्या भाषणाची आठवण करून देत सांगितले की, सुशिल कुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवादी असे वत्कव्य केले हेाते.

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासाखी:मोदी

मतदानापूर्वीच पवार यांनी मैदानातून पळ काढला: मोदी

पवार यांचा पक्ष सभ्रमात पडला आहे

विदर्भातील दुष्काळ आघाडी सरकारमुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवार यांना देखील माहिती आहे जनतेचे वारे कुठे वाहत आहे: मोदी

जनतेला माहिती आहे भाजपने कोणाला पळवुन लावले आहे.

तुमचा चौकिदार हा आरोप हा माझ्यासाठी दागिना आहे: नरेंद्र मोदी

गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडेल : मोदी

मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी : पंतप्रधान नरेंद्र मोदी