सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान

blank

टीम महाराष्ट्र देशा : सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली, आणि ज्यांनी त्या आणिबाणीला विरोध केला तेच आता त्यांच्याशी हातमिळवणी करत आहेत, अशा शब्दात प्रस्तावित महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे.

विरोधकांना फक्त त्यांची आणि त्यांच्या कंटुबियांची चिंता आहे, त्यांचे समाजाशी काही देण घेणं नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. संत कबीर यांच्या ५०० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
नुकत्याच झालेल्या कैराना, फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता.

या सर्व निवडणुकींमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस व राष्ट्रीय लोक दल या सर्वांनी मिळून एकच उमेदवार उभा केला होता. मोदींनी समाजवाद आणि बहुजन अशा शब्दांचा वापर करत अप्रत्यक्षरित्या मायावती व मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका केली. मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही लक्ष्य केले.