तुम्ही इतक्या उंचीवर पोहोचला की तुमचा जमिनीशी संपर्क तुटला ; मोदींचा विरोधकांना टोला

PM-Narendra Modi

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम देशवासीयांसाठी एक शब्द उच्चारला आहे. ज्यांना कुणी नाही त्यांच्यासाठी माझं सरकार आहे, असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले. ते संसदेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात सुरू असलेल्या चर्चेला उत्तर देत विरोधकांवर निशाणा साधत विरोधी पक्षांना चिमटे काढले. गेल्या पाच वर्षात देशात घडलेला बदल आणि येणाऱ्या वर्षात सरकारची ध्येय यावर मोदींनी भाष्य केले. आधीच्या सरकारांबद्दल जनतेत हे का नाहीत करत? असे प्रश्न उपस्थित व्हायचे, परंतु आमच्या सरकारच्या काळात हेही काम सरकार का करतं? असा प्रश्न उपस्थित होत आहेत, इतका बदल आम्ही करून दाखवलाय, असे नरेंद्र मोडी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आम्ही दुसऱ्यांचा मोठापणा कमी करण्यात विश्वास ठेवत नाहीत, तर स्वतः कसे मोठे व्हायचा याच्यावर पूर्ण आयुष्य घालवतो, असे म्हणत उंची बद्दल आमची तुमच्याशी स्पर्धाच नाही. तुम्ही इतक्या उंचीवर पोहोचला की तुमचा जमिनीशी संपर्क तुटलाय. तुमची उंची तुम्हालाचं मुबारक, असा टोलाही मोदी यांनी काँग्रेसला लगावला.