fbpx

विशेष मुलाखत : राम मंदिराचा अध्यादेश नाहीच ; पंतप्रधानांची मोठी घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात वातावरण तापलेले आहे.आता चार वर्षात पंतप्रधान मोदींनी ए.न.आय. ला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. राममंदिरासाठी सरकार अध्यादेश आणणार नाही असे मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी मोदींनी राम मंदिरावरून कॉंग्रेसलाही लक्ष केले. ७० वर्ष सत्तेत असणाऱ्या कॉंग्रेसमुळेच राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित राहिला असल्याचेही सांगितले. राममंदिराचा मुद्दा घटनात्मक मार्गाने सोडवला जाईल व सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहिली जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच अध्यादेशावर विचार केला जाईल असेही सांगितले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशभरात शिवसेनेही रान पेटवले आहे.मात्र सरकार राममंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही असे स्पष्ट केल्याने शिवसेनेसाठी अडचण निर्माण झाली आहे.सत्तेत सोबत असणारी शिवसेना आता कायम भूमिका घेते ते बघावे लागणार आहे.