निकाल निराशाजनक, मात्र झुंज दमदार ; भारताच्या पराभवावर मोदींची प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या आज झालेल्या सेमी फायनलमध्ये भारताला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. निकाल निराशाजनक असला तरी भारताचा संघ नेटाने लढला, असे नरेंद्र मोदींनी म्हंटले.

Loading...

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा आज मॅन्चेस्टरमध्ये भारता विरुद्ध न्यूजीलैंड अशा सेमी फायनल लढतीत भारताचा 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सर्व क्रिकेटप्रेमी निराश झाले आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. निकाल निराशाजनक असला तरी हिंदुस्थानचा संघ नेटाने लढला, असे ट्वीट नरेंद्र मोदींनी केले.

इतकेच नव्हे तर सामन्याच्या निकाल निराशाजनक आहे. परंतु शेवटपर्यंत झुंज देण्याची टीम इंडियाची लढाऊ वृत्ती वाखणन्याजोगी आहे. हिंदुस्थानने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये दमदार कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. जय आणि पराजय हा खेळाचा भाग आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हंटले. याचबरोबर भारताच्या सर्व खेळाडूंना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.Loading…


Loading…

Loading...